Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोदींची आंधी, नाही टिकले राहुल गांधी, आता 21 राज्यांवर भाजप राज...

मोदींची आंधी, नाही टिकले राहुल गांधी, आता 21 राज्यांवर भाजप राज...
एकदा पुन्हा नरेंद्र मोदी यांनी सर्व अंदाज - अनुमान खोटे ठरवतं दक्षिण भारतात विजय मिळवला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या सेमीफायनलमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे.
 
दक्षिण भारतात भाजपसाठी हे परिणाम एक नवी सुरुवात आहे तर काँग्रेससाठी आता अस्तित्व टिकवून ठेवण्याची झुंज आहे. आताच्या परिस्थितीत पूर्ण भारतात सुमारे 65 टक्के राज्यांमध्ये भाजप सरकार आहे. गुजरात येथील 'आंबट गोड हार' याने खूश राहुल गांधी यांच्या काँग्रेस अध्यक्ष बनल्यावर ही पहिली धक्कादायक हार सिद्ध होत आहे.
 
आता काँग्रेस केवळ पंजाब, मिझोराम आणि पुडुचेरी येथे सत्तामध्ये आहे. तसेच वर्तमान स्थितीत भाजप 29 राज्यांमधून 20 जागांवर सत्तेवर आहेत आणि ट्रेड मते 21 व्या राज्यात सरकार बनवण्याचा वाटचालेवर आहे.
 
तसेच अॅटी इनकम्बेंसी (सत्ता विरोधी लाट) असण्याचे तेव्हाच कळून आले होते जेव्हा यंदा सर्वाधिक 72.13 टक्के मतदान झाले. उल्लेखनीय आहे यापूर्वी 2008 (65.1%) च्या तुलनेत 2013 (71.45%) मध्ये सुमारे 6% अधिक मतदान झाले होते. तेव्हा सरकार बदलली होती आणि भाजपने पहिल्यांदा पूर्ण बहुमतासह सरकार बनवली होती.
 
या निवडणुकीत मोदी यांनी 21 सभा संबोधित केल्या आणि सुमारे 115 जागांवर याचा सकारात्मक प्रभाव दिसून आला आहे. राहुल गांधी यांनी 14 जागी प्रचार केला आणि ज्यातून सर्व जागांवर काँग्रेस उमेदवार पिछाडीवर राहिले. (वेबदुनिया इलेक्शन डेस्क) 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कर्नाटकामध्ये BJPच्या यशानंतर शेअर बाजारात उसळी