दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल हे कट्टर हिंदुत्वाचा अजेंडा राबवत
असल्याचा आरोप होतो आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हनुमानजींचा आशीर्वाद मिळला. आता दिल्लीतील शाळा, मदरशांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये हनुमान चालीसा सक्तीची करा', असे ट्विट करत भाजपचे वरिष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला होता. मात्र 'आप'ने भाजप नेत्याची म्हणणे गंभीरतेने घेतल्याचे दिसते. 'आप'चे आमदार सौरभ भारद्वाज यांनी एक निमंत्रण छापले. दर मंगळवारी आपल्या विधानसभा मतदारसंघात सुंदरकांडची कथा दाखवण्याची घोषणा त्यांनी केली. यामुळे 'आप'ची वाटचाल हिंदुत्वाकडे सुरू असल्याचे बोलले जाते.
भाजपच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यासमोर विरोधी पक्ष टिकत नसल्याचे 'आप'च्या लक्षात आले. मतदानापूर्वीही केजरीवाल हे हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यावरून 'आप'ही भाजपच्या हिंदुत्वाला हिंदुत्वाने उत्तर देण्याच्या तयारीत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर 'आप' आता राष्ट्रीय पातळीवरील राजकीय लढाईची तयारी करते. राष्ट्रीय पातळीव काँग्रेसची स्थिती अतिशय वाईट आहे. अशात 'आप' राष्ट्रीय स्तरावर कंबर कसून उतरण्याचा तयारीत आहे. राष्ट्रीय स्तरावर 'आप'चा सामना भाजपशी आहे आणि भाजपचा सामना करायचा असेल तर हिंदुत्वापासून दूर राहता येणार नाही, हे 'आप'ने ओळखले.
गेल्या वर्षात भाजपने पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशात मुस्लीम कट्टरवादाविरोधात जय श्रीराम आणि हनुमान चालीसाचा नारा दिला. पश्चिम बंगालमध्ये मुस्लीम रस्त्यावर नमाज पठण करत असताना भाजपने रस्त्यावर हनुमान चालीसा वाचण्याचा प्रयोग केला. गुजरात आणि मध्य प्रदेशातील निवडणुकीवेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंदिरांना भेटी दिल्या. काँग्रेसने मवाळ हिंदुत्वाचे धोरण स्वीकारले होते. त्यावेळी भाजपने काँग्रेसचे हिंदुत्व बेगडी असल्याचा आरोप केला. आता 'आप' कट्टर हिंदुत्वाच्या अजेंड्यावर पुढे जात असल्याच्या प्रयत्नात आहेत. यामुळे आगामी काळात भाजपसमोर 'आप'चे आव्हान असेल. भाजपने विधानसभा निवडणुकीत शाहीनबाग आणि हनुमानचा मुद्दा केला होता ते पाहता 'आप'चे नेते सतर्क झाले आहेत. त्यांनी बहुसंख्य मतदारांवर आपले लक्ष केंद्रित केले.