Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'Kithana ache he Modi' ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची मोदींसोबत सेल्फी

Kithana ache he Modi
Webdunia
भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भक्त हे तर आपण ऐकलंच असेल परंतू देशाबाहेर देखील मोदी किती प्रसिद्ध आहे हे कळून येतं. इतर देशांच्या नेत्यांनाही मोदींचं ऐवढं कौतुक आहे ते त्यांच्यासोबत सेल्फी काढतात. 
 
जपानमध्ये जी 20 देशाची शिखर परिषद सुरु असून या दरम्यान ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीत ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींचे कौतुक करत त्यांच्यासोबत सेल्फी काढला. 
 
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी आपल्या ट्विटर हॅँडलवरुन एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, 'Kithana ache he Modi' (कितना अच्छा है मोदी!) आणि यासोबतच त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत घेतलेला सेल्फी फोटो अपलोड केला आहे. 
 
जी 20 परिषदेत गंभीर मुद्द्यावर नेत्यांची चर्चा सुरु आहे. या दरम्यान शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. यावेळी ट्रम्प यांनी लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल मोदींचं अभिनंदन केलं. या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील मोदींचं कौतुक करत म्हटलं की निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल तुमचं अभिनंदन आणि तुम्ही या विजयास पात्र आहात. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा निवडणूक जिंकलात, तेव्हा अनेक गट आपापसात लढत होते. मात्र आता ते एकत्र आले आहेत. यातून तुमची अद्भुत क्षमता दिसते,' अशा शब्दांमध्ये ट्रम्प यांनी मोदींचं कौतुक केलं. ट्रम्प यांनी केलेल्या कौतुकाबद्दल मोदींनी त्यांचे आभार मानले. 
 
तेव्हा मोंदींनी आपला नारा सबका साथ, सबका विकास हा आमचा मंत्र असून मेक इन इंडियाच्या माध्यमातून आम्ही पुढे जात असल्याचं ट्रम्प यांना सांगितलं. तर गेल्या काही वर्षांत भारत- अमेरिकेचे संबंध सुधारले असून ही  मैत्री नव्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे महणत ट्रम्प यांनी मोदींना चांगले मित्र असल्याचे देखील म्हटले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

पुढील लेख
Show comments