Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लखीमपूर खिरी : 'शेतकऱ्यांना चिरडण्याच्या' घटनेचा कथित व्हीडिओ व्हायरल

Webdunia
मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (10:44 IST)
लखीमपूर खिरीमधल्या तिकुनियामध्ये झालेल्या घटनेचा तथाकथित व्हीडिओ व्हायरल झालाय.काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रांनीही एक व्हीडिओ ट्वीट केलाय. हा व्हीडिओदेखील व्हायरल झालेला आहे.
 
हा व्हीडिओ ट्वीट करत प्रियांकांनी म्हटलंय, "नरेंद्र मोदीजी तुमच्या सरकारने मला कोणत्याही ऑर्डर वा FIR शिवाय गेल्या 28 तासांपासून अटकेत ठेवलंय. अन्नदात्याला चिरडणाऱ्या या व्यक्तीला अजून अटक झालेली नाही. असं का?"

<

.@narendramodi जी आपकी सरकार ने बग़ैर किसी ऑर्डर और FIR के मुझे पिछले 28 घंटे से हिरासत में रखा है।

अन्नदाता को कुचल देने वाला ये व्यक्ति अब तक गिरफ़्तार नहीं हुआ। क्यों? pic.twitter.com/0IF3iv0Ypi

— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 5, 2021 >तिकुनियामध्ये जिथे ही घटना घडली, तिथला हा व्हीडिओ असल्याचं सांगितलं जातंय. रस्त्यामध्ये उभ्या असणाऱ्याला लोकांना चिरडून एक थार (Thar) जीप वेगाने पुढे जात असल्याचं या व्हीडिओमध्ये दिसतं. या जीपमध्ये काही लोक बसल्याचंही व्हीडिओत दिसतं.
 
या जीपच्या मागून एक फॉर्च्युनर गाडी येताना दिसते. आपलं म्हणणं या व्हीडिओमुळे सिद्ध होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. पण पोलीस या व्हीडिओचा त्यांच्या तपासात समावेश करून घेतात का, हे आता पाहायला हवं.
 
सोमवारी रात्री व्हॉट्सअॅप आणि फेसबुक बंद पडल्याने हा व्हीडिओ तितकासा पसरला नव्हता. पण मंगळवार ( 5 ऑक्टोबर) सकाळपासून हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.तर लखीमपूर खिरीमधली इंटरनेट सेवा अजूनही बंद आहे.
 

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

नवीन पिढीला संधी देत नाहीये पीएम नरेंद्र मोदी, तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी आहे उत्सुक- उद्धव ठाकरे

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

Show comments