Marathi Biodata Maker

चारा घोटाळा सुनावणी : शिक्षेची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

Webdunia
शुक्रवार, 5 जानेवारी 2018 (08:28 IST)

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यावरील शिक्षेची सुनावणी आज पुन्हा पुढे ढकलण्यात आली. चारा घोटाळा प्रकरणी ‘राजद’ नेते लालू प्रसाद यादव यांच्यासह १६ जणांना बुधवारी (३जानेवारी) सीबीआयच्या विशेष न्यायालयात शिक्षा सुनावली जाणार होती. मात्र, सीबीआय न्यायलयातील सहकारी वकील विंदेश्‍वरी प्रसाद यांचे निधन झाल्यामुळे ही सुनावणी आज (गुरुवार) होणार होती. मात्र आजही ही सुनावणी होऊ शकली नाही. 

रांचीतील विशेष सीबीआय न्यायालयाने राजदचे नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यासह अन्य १५ जणांना २३ डिसेंबरला न्यायलयाने दोषी ठरवले होते.  लालू प्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री असताना पशुसंवर्धन खात्याने बिहारच्या विविध जिल्ह्यांत कोषागारातून चारा खरेदीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये अवैधरीत्या काढल्याचा आरोप आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

पुढील लेख
Show comments