Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बिबट्याचा वर्गात घुसून मुलांवर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

बिबट्याचा वर्गात घुसून मुलांवर हल्ला  घटना सीसीटीव्हीत कैद
Webdunia
शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (12:57 IST)
निवासी भागात बिबट्या शिरल्याच्या बातम्या वारंवार येत आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील एका महाविद्यालयात बिबट्याने वर्गात प्रवेश केला, ज्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. चौधरी निहाल सिंग इंटर कॉलेजमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे.
 
भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी कलानिधी नैथानी यांनी ट्विटरवर शेअर केलेले फुटेजमध्ये बिबट्या वर्गात फिरताना दिसत आहे. तो वर्गात फिरत होता आणि या बिबट्याने एका विद्यार्थ्यालाही जखमी केल्याचे सांगण्यात येत आहे. शाळांचे जिल्हा निरीक्षक धर्मेंद्र शर्मा म्हणाले, “विद्यार्थी जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात नेण्यात आले आणि आता तो पूर्णपणे निरोगी आहे.”
https://twitter.com/ipsnaithani/status/1466037783093334021

पोस्टसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, "अलिगडमधील चरा भागातील एका महाविद्यालयात बिबट्याने हल्ला केल्याची माहिती मिळाल्यानंतर, वन आणि पोलिस अधिकारी बचावासाठी धावले." अधिकारी कलानिधी नैठानी यांनीही सांगितले की, बिबट्याला जेरबंद करून कॉलेज कॅम्पसमधून दूर नेण्यात आले आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

पुढील लेख
Show comments