पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोरोना व्हायरसचा परिस्थितीवर देशाला संबोधित करतील.09:05 PM, 20th Apr कोरोना उपायांचे पालन शंभर टक्के करा कोरोना विरुद्ध लढाई जिंकण्यासाठी अनुशासानाची गरज आहे गरज नसल्याशिवाय बाहेर पडू नका कडक निर्बंधाचं पालन करा साहस, धैर्य, अनुशासन ठेवल्याने परिस्थिती बदलता येईल09:03 PM, 20th Apr आता टेस्टिंग मोठ्या प्रमाणावर गरजूंच्या मदतीसाठी अनेक जणांनी घेतला पुढाकार जनतेनं स्वयंशिस्तीने वागावे तर लॉकडाऊनची परिस्थिती येणार नाही देशाला लॉकडाउनपासून वाचवायचं आहे मायक्रो कंटेटमेंट क्षेत्रावर लक्ष द्यायचं आहे08:58 PM, 20th Apr भारताने जगातील सर्वात स्वस्त लस तयार केली सरकारी रुग्णालयात मोफत लस मिळत राहणार आतापर्यंत 12 कोटी लोकांना कोरोनाची लस08:55 PM, 20th Apr बेडच्या संख्येत वाढ करतोय मोदींनी स्वच्छता कर्मचार्यांचे आभार लसीचंही मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरु देशात दोन स्वदेशी लसीचं उत्पादन देशात वेगानं लसीकरण मोहिम सुरु08:53 PM, 20th Apr पोलिसाचं कार्य मोलाचं देशात ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली ऑक्सिजन निर्मितीसाठी सर्वोपरी प्रयत्न देशात औषधांचा उत्पादन वाढवलं08:48 PM, 20th Apr दुसरी लाट वादळासारखी आलीय मृत्यमुखी पडलेल्यांच्या दु:खात सहभागी