Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नोटबंदीवर संसदमध्ये काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी...

Webdunia
गुरूवार, 24 नोव्हेंबर 2016 (12:15 IST)
- नवी दिल्ली- नोटाबंदीच्या निर्णयाच्या समर्थनार्थ केंद्राकडून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर
- नोटाबंदीमुळे हरयाणा सरकार क आणि ड श्रेणीच्या सरकारी कर्मचा-यांना त्यांच्या वेतनातील १० हजार रुपये रोखीने देणार.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिटलरपेक्षा जास्त उत्पात माजवला असून, त्यांना स्विस बँकेतील काळा पैसा परत आणणे शक्य झाले नाही पण ज्यांच्याकडे कष्टाचा व्हाईट पैसा आहे त्यांना त्रास होत आहे - ममता बॅनर्जी, पश्चिमबंगाल मुख्यमंत्री.
- राज्यसभेचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित.
- जुन्या नोटा ठराविक ठिकाणी स्वीकारण्याची मुदतवाढ होण्याची शक्यता - सूत्र
- नवी दिल्ली : राज्यसभा दुपारी 3 वाजेपर्यंत स्थगित, पंतप्रधानांच्या निवेदनाच्या मागणीवर विरोधकांचा गदारोळ
- भाजप नेते अनंत कुमार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी केंद्र सरकारचे मंत्री भाजप खासदारांना नोटाबंदीचा विषय समजावून सांगणार, मनोहर पर्रिकर, राजनाथ सिंह, सुरेश प्रभू, व्यंकय्या नायडू, अरुण जेटली आणि जेपी नड्डा रहाणार उपस्थित.
- नवी दिल्ली - भाजपाचे मंत्री संध्याकाळी 7 वाजता पक्ष खासदारांची भेट घेऊन नोटाबंदी निर्णयाची माहिती देणार.
- रांगेत उभं राहून शेतकरी देशभक्त होणार का ?, शेतक-यांना त्यांचे पैसे परत मिळायला हवेत, केंदातलं सरकार लोकांना आपलं वाटतं नाही - उद्धव ठाकरे.
 - कोणत्याही निर्णयाआधी लोकांना विश्वासात घ्यावं, नोटाबंदीवर उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य.
 - डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण, रुपया 30 पैशांनी घसरला असून 68.86 वर पोहोचला.
 - काळापैसा अर्थव्यवस्थेतून काढला पाहिजे पण त्याचे व्यवस्थापन चुकीचे आहे - मायावती.
 - राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब.
 - नोटाबंदीसाठी पंतप्रधानांनी जी पद्धत अवलंबली त्याला आमचा विरोध आहे, सामान्यांना भोगावं लागत आहे - मायावती.
 - नोटाबंदीवरील गोंधळानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब.
- नोटाबंदीचा निर्णय देशाच्या हिताचा नसून उत्तरप्रदेश निवडणुका लक्षात घेऊन घेतला गेला - नरेश अग्रवाल.
- ज्या देशांनी चलन बंद केले तिथे हुकूमशहांचे राज्य होते, कोणताही नेता, व्यवसायिक रांगेत उभा राहत नसून सामान्य माणसाला उभं राहावं लागत आहे - नरेश अग्रवाल.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अघोषित आर्थिक आणीबाणी लागू केली आहे - नरेश अग्रवाल.
- स्तुती सर्वांना आवडते, आणीबाणी लागू झाल्यानंतर इंदिरा गांधींनाही समर्थनार्थ पत्र आली होती पण निकाल काय आला होता ते सर्वांनी पाहिलं - नरेश अग्रवाल.
- लोकांचा त्रास कमी व्हावा यासाठी काय उपययोजना केल्या आहेत याची माहिती पंतप्रधानांनी द्यावी - मनमोहन सिंग.
नोटाबंदी निर्णयामुळे जीडीपी 2 टक्क्यांनी घसरेल, शेती आणि छोट्या उद्योगांना फटका बसणार आहे - मनमोहन सिंग.
- पंतप्रधानांनी अशा देशाचं नाव सांगावं जिथे लोकांनी बँकेत पैसे जमा केले मात्र त्यांना काढण्याची परवानगी देण्यात आली नाही - मनमोहन सिंग.
- पंतप्रधानांच्या निर्णयामुळे सामान्य लोकांना त्रास होत आहे, 50 दिवसांचा काळ गरिबांसाठी खूप मोठा आहे - मनमोहन सिंग.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या मुद्यावर नोटाबंदी केली त्यावर माझी असहमती नाही, मात्र त्यासाठी पुर्वतयारी करण्यात आली नाही - मनमोहन सिंग.
- नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत उपस्थित, नोटाबंदीवर बोलण्याची शक्यता
- समादवादी पक्षाचे खासदार अक्षय यादव यांनी पेपर फाडून लोकसभा अध्यक्षांच्या दिशेने फेकला.
- पंतप्रधानांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर आर्थिक गोंधळाची स्थिती आहे, या पार्श्वभूमीवर विरोधीपक्षांना पंतप्रधानांकडे स्पष्टीकरण मागण्याचा पूर्ण अधिकार आहे - आनंद शर्मा, काँग्रेस खासदार.
- नोटाबंदीच्या निर्णयावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना विद्यमान केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बोलू दिले नाही हे निदंनीय आहे - आनंद शर्मा, काँग्रेस खासदार.
हिवाळी अधिवेशन - नोटा बंदीच्या मुद्यावरुन गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित.
हिवाळी अधिवेशन - लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित.
राज्यसभेत विरोधकांचा गदारोळ कायम, नोटाबंदीवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव संसदेत पोहोचले.
नवी दिल्ली - संसदेत राजनाथ सिंग यांच्या चेंबरमध्ये बैठक, अरुण जेटली, अनंत कुमार आणि वैंकय्या नायडू उपस्थित.
- नवी दिल्ली - नोटाबंदीवर विरोधकांच्या बैठकीला सुरुवात, संसदेत सुरु आहे बैठक.
नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह सभागृहातील सर्वपक्षीय नेत्यांची सकाळी 10 वाजता घेणार भेट.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत उपस्थित राहून नोटाबंदीवर निवेदन देण्याची शक्यता.
सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

पुढील लेख
Show comments