Marathi Biodata Maker

कामुक भूत! केवळ महिलांची काढतो छेड...

Webdunia
भुतांवर विश्वास करत असाल तर एक नवीन गोष्ट नजरेत येत आहे की माणसांप्रमाणे भूतदेखील कामुक असतात जे केवळ महिलांच्या नाजुक अंगाची छेड काढतात. बंगालच्या अलीपुरद्वार जिल्ह्यातील काही गावांमध्ये अश्या भयानक प्रकरण ऐकायला मिळाले आहे.
 
अलीपुरद्वार शहराच्या जवळपास असलेल्या गावांमध्ये भूत असल्याचे केवळ स्त्रियांना जाणवले. हा भूत केवळ महिलांवर हल्ला बोलतो. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली ज्यात रात्री 11 वाजता घरातून बाहेर पडलेल्या एक महिलेला काळ्या सावलीने धरल्याचे जाणवले. ती ओरडल्यामुळे गावातील लोकं तिथे पोहचले आणि भूत पळाला. 
समुकतला गावातील स्त्रिया, मुली रात्री घरातून बाहेर पडायला घाबरतात. काळी सावळी डोक्यावर निघून गायब होते असे येथील लोकांचे म्हणणे आहे. आनंद बाजार पत्रिकाच्या अनीमा देवी महिलेने सांगितले की तिचे गाव कोहिनूर टी एस्टेट जवळ आहे. तिथे संध्याकाळी 17 वर्षीय मुलीला घरी वापर जाताना जाणवले की एक काळी सावली तिला जंगलात खेचत आहे. ती ओरडली, गावातील लोकं जमा झाली परंतू तिथे कोणीच नव्हतं.
 
गावातील एका तरुण महिलेने सांगितले की घराबाहेर भांडी घासताना कोणीतरी तिचे तोंड झाकून दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होतो. पत्रिकाप्रमाणे चहा बागानाजवळ पाचहून अधिक प्रकरण घडून चुकले आहे. या प्रकरणात पंचायत प्रमुख रेशमा यांचे म्हणणे आहे की हे काम साधारण मनुष्याचे आहे जो स्वत:च्या शरीरावर तेल लावून लोकांच्या तावडीतून पळत सुटतो. या प्रकरणांमध्ये पोलिसाची मदत घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
 
लोकांनी या सावलीचे नाव पिछला भूत असे ठेवले आहे. परंतू असे प्रकरण सतत घडत असून तिथल्या महिलांनी आता संध्याकाळी घरातून बाहेर पडणे बंद केले आहे. आता गावातील लोकं तंत्र-मंत्र उपाय करण्याचा विचार करत आहे. तसेच हे प्रकरण मात्र विचित्र जाणवत आहे की असे कोणते भूत आहे, जो केवळ महिलांवर हल्ला करतो आणि गर्दी बघून गायब होतो?
सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

पुढील लेख
Show comments