Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सिगारेट जाळू नका म्हटल्यावर त्याने महिलेसमोर काढली पँट

सिगारेट जाळू नका म्हटल्यावर त्याने महिलेसमोर काढली पँट
लैंगिक अत्याचाराचं एक प्रकरण सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. हे प्रकरण केरळच्या जेद्दाहहून नवी दिल्लीकडे प्रवास करत असलेल्या एका 24 वर्षीय व्यक्तीचं आहे, ज्याने महिला केबिन स्टाफ द्वारे सिगारेट जाळण्यापासून रोखल्यामुळे आपली पँट काढली.
 
हे प्रकरण घडलं तेव्हा आरोपी सऊदी एअरलाइंसच्या फ्लाईटमध्ये प्रवास करत होता. घटनेनंतर व्यक्तीची ओळख पटली आहे. तो केरळच्या कोट्टायम येथील रहिवासी आहे. मीडिया रिपोर्ट्सप्रमाणे त्याचं नाव अब्दुल शाहिद शम्सुद्दीन असे आहे.
 
माहितीनुसार, शम्सुद्दीनला फ्लाईटमध्ये सिगारेट जाळण्यासाठी इनकार केल्यावर त्याने क्रू मेंबरच्या महिलेला शिवीगाळ करायला सुरुवात केली, नंतर त्याने फ्लाईटमध्ये हल्ला केला. त्याचा तमाशा बघत महिलेने आपल्या सहयोगी स्टाफला मदतीसाठी बोलवले. यावर त्या व्यक्तीने आपली पँट काढली आणि महिलेला अश्लील इशारे करू लागला.
 
या घटनेनंतर चालक दलाच्या सदस्यांनी विमानतळाच्या संचलन नियंत्रण केंद्राला सूचित केले नंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बळाला (CISF) याबद्दल सूचित करण्यात आले, नंतर सुरक्षाकर्मचार्‍याने त्याला अटक केली आणि आयजीआय एअरपोर्ट पोलिस स्टेशन घेऊन गेले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उद्दिष्टावर आधारित गुंतवणुकीचा दृष्टिकोन सर्वोत्तम का ठरतो