Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अय्यर काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित

Webdunia
शुक्रवार, 8 डिसेंबर 2017 (09:41 IST)
पं तप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या शब्दामध्ये केलेली टीका काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांना भोवलेली आहे. काँग्रेसनं मणीशंकर अय्यर यांना काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित केलं आहे. तसंच काँग्रेसनं अय्यर यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

मणिशंकर अय्यर यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, जेव्हा मी ‘नीच’ म्हणालो त्याचा अर्थ खालच्या जातीचा असा होता. हिंदी माझी मातृभाषा नाहीये, त्यामुळे मी जेव्हाही हिंदी बोलतो तेव्हा इंग्रजीत विचार करतो. अशात जर याचा काही चुकीचा अर्थ निघत असेल तर मी माफी मागतो. दररोज पंतप्रधान मोदी आमच्या नेत्यांबाबत अभद्र भाषेचा वापर करतात. मी एक फ्रिलान्स कॉंग्रेसी आहे, मी पक्षाच्या कोणत्याही पदावर नाहीये. त्यामुळे मी पंतप्रधानांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ शकतो.

संबंधित माहिती

सात्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले

Russia-China: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी घेतली शी जिनपिंग यांची भेट

SRH vs GT : पावसामुळे सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर कोहलीचे विधान,काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन

फिलिपाइन्स ने नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा चीनचा इशारा

पुढील लेख
Show comments