PM @narendramodi will address the nation at 10 AM today.
— PMO India (@PMOIndia) October 22, 2021 async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"> >पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी कोरोना काळात 9 वेळा देशाला संबोधित केले आहे. त्यांनी पहिले संबोधन त्यांनी 19 मार्च 2020 ला दिले होतेज्यात त्यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. यानंतर, दुसऱ्यांदा 24 मार्च 2020 रोजी देण्यात आले.ज्यामध्ये त्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. तिसऱ्यांदा त्यांनी 3 एप्रिल 2020 रोजी राष्ट्राला संबोधित केले. या मध्ये त्यांनी 9 मिनिटे दिवे बंद करण्याचे आवाहन केले. चौथ्यांदा 14 एप्रिल 2020 रोजी संबोधित केले. या मध्ये त्यांनी 3 मे पर्यंत देशात लॉकडाऊनची घोषणा केली. 12 मे 2020 रोजी पाचवे संबोधन देण्यात आले या मध्ये त्यांनी स्वावलंबी भारत मोहिमेसाठी 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. 30 जून 2020 रोजी सहाव्यांदा अन्न योजना नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याची घोषणा करण्यात आली. सातव्यांदा, 20 ऑक्टोबर 2020 रोजी, लोकांना एकदा कोरोनाबद्दल चेतावणी देण्यात आली. 20 एप्रिल 2021 रोजी आठव्यांदा राज्यांना कोरोनाविरुद्ध चेतावणी देण्यात आली. नवव्या वेळी, 7 जून, 2021- पंतप्रधान मोदींनी नवीन लस धोरण जाहीर केले, या अंतर्गत केंद्र सरकार ने कोरोनालसीकरणाची मोहीम राबविण्याची जबाबदारी घेतली.