ओझर येथील वायुदलाचा देशील पहिला , एकमेव बेस डेपो दुरुस्ती बांधणी करतो अग्रगण्य अश्या मिग २९ आणि सुखोई ३० एमकेआय लढाऊ विमान सुखोई ३० MKI ची चाचणी पूर्ण झाली असून, लवकरच देशसेवेत दाखल होणारा आहे. सोबतच ओझर येथे भारतीय बायुदालाचा देशातील एकमेव आणि पहिला एअर बेस असून येथे भारतीय संरक्षण दलातील सर्वात आधुनिक मिग २९ , सुखोई ३० MKI
लढाऊ विमान यांची दुरुस्ती देखभाल , चाचणी करण्यात येते. येथेच नवीन तंत्राचे संशोधन करत लढावू विमाने अधिक आक्रमक व सुरक्षित केली जातात. वायुदलाचा ८६ वा वायुसेना दिवस असल्याने माध्यमांना एअर कमांडर समीर व्ही.बोराडे( विशिष्ट सेवा मेडल ने सन्मानित ) यांनी माहिती दिली आहे.
ओझर येथे भारतीय संरक्षण दलातर्फे वायुसेनेसाठी २९ एप्रिल २०७४ रोजी याची स्थापना केली गेली आहे. यातील विशिष्ठ काम पाहता या ठिकाणाला लष्कराने ११ बेस एअरपोर्ट असे विशेष नाव दिले आहे. याठिकाणी लढाऊ विमाने जी भारतात आहेत.
त्यांचे सर्व तांत्रिक दुरस्ती, देखभाल आणि चाचणी केली जाते. यामध्ये आजपर्यंत १०० एस यु-७ , मिग २३, आदींचे यशस्वी देखभाल केली आहे. तर साल १९९६ मध्ये महिले मिग २९ येथे दाखल झाले यांनी त्याची यशस्वी चाचणी घेत ते लष्करात सामील केले आहे.सद्याचे सुखोई ३० हे २४ एप्रिल २०१८ रोजी उड्डाणाची यशस्वी चाचणी घेतली गेली आहे.तर भारतीय वायुदलाने संशोधन करत सु-३० MKI विमानचालक आधुनिक इंजेक्शन सीट बेंचचा यशस्वी चाचणी घेतली आणि या तंत्राची चाचणी घेतली याबदल पंतप्रधान मोदी यांनी गौरव केला आहे.
वायुदलाचा देशातील हा एकमेव बेस असून त्यांनी आयएसओ प्रमाणपत्र मिळवले आहे.या ठिकाणी लष्कराने संशोधनासाठी ११ विशेष केंद्र उभारली आहे. सोबतच मायक्रो स्केल मायक्रो एंटरप्राईज अंतर्गत सुटे भाग निर्मिती केली जाते. तर मेक इन इंडिया अंतर्गत काम सुरु असून वायुदलाचे आधुनिक तंत्रज्ञान विकसित करत देशातील इतर ठिकाणी सुद्धा दिले जाते.