Publish Date: Fri, 28 Sep 2018 (14:35 IST)
Updated Date: Fri, 28 Sep 2018 (14:37 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार म्हणजे लुटारूंची कंपनी आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.
राफेल कराराचा संदर्भ देत राहुल यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. या संदर्भातली एक कविताच त्यांनी त्यांच्या अधिकृत टि्वटर हँडलवर पोस्ट केली आहे. मोदी अंबानी का देखो खेल, ' एचएएल से छीन लिया राफेल' अशी या कवितेची सुरूवात आहे. आपण सगळे मिळून लुटारूंची कंपनी थांबवू, असे आवाहनही त्यांनी केले आहे.