भारताने अॅडव्हान्स एअर डिफेन्स इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची गुरुवारी यशस्वी चाचणी घेतली. या तंत्रज्ञानामुळे शत्रूने डागलेले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र टार्गेटवर पोहोचण्याआधीच हवेतच नष्ट करता येऊ शकते. ओदिशा येथील तळावर ही चाचणी घेण्यात आली. डीआरडीओने विकसित केलेल्या
सुपरसॉनिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची या वर्षातील ही तिसरी चाचणी होती.
बंदुकीतून सुटलेल्या गोळीचा मार्ग गोळीनेच रोखणे अशा प्रकारची ही चाचणी आहे. गुरुवारी सकाळी पावणेदहा वाजता ओदिशाच्या बालासोर समुद्र किना-याजवळच्या व्हीलर बेटावर ही चाचणी घेण्यात आली. महत्वाचे म्हणजे हे इंटरसेप्टर क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान भारतातच विकसित करण्यात आले आहे.
चाचणीमध्ये इंटरसेप्टर क्षेपणास्त्राने टार्गेटच्या दिशेने येणा-या पृथ्वी क्षेपणास्त्राचा अचूक वेध घेतला.