Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनसुख हिरेन केसचा गुंता सुटला.. शिवदीप लांडे यांची फेसबुक पोस्ट !

Webdunia
सोमवार, 22 मार्च 2021 (07:59 IST)
सचिन वाझेंना महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आदेश दिल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केल्याने खळबळ उडालेली असताना दुसरीकडे मनसुख हिरेन प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आलेला पोलीस विनायक शिंदे (५१) आणि बुकी असलेला नरेश गोर (३१) याला महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे. त्यानंतर राज्याच्या एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी फेसबुक पोस्ट करून अत्यंत संवेदनशील मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील गुंता सुटला असल्याची माहिती दिली आहे.
 
तसेच शिवदीप लांडे यांनी या फेसबुक पोस्टमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून रात्रंदिवस एक करून याप्रकरणी न्याय्य पद्धतीने काम केलेल्या माझ्या एटीएस पोलिस दलाच्या सर्व सहकार्यांना मी मनापासून अभिवादन करतो. माझ्या पोलिस कारकीर्दीची आजपर्यंतची ही सर्वात जटिल घटना होती. असे नमूद केले आहे. सचिन वाझे यांचा ताबा एटीएसला हवा आहे. त्यासाठी सचिन वाझे यांच्याविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा एटीएसने कोर्टात केला आहे. एटीएसच्या या दाव्यामुळे सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
 
सचिन वाझे यांचा मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणातही हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यातच वाझे यांच्याविरोधात अनेक महत्त्वाचे ठोस पुरावे एटीएसच्या हाती लागले आहेत. सचिन वाझेंचा प्रथम दर्शनी ह त्या प्रकरणात सहभाग असल्याचा दावा करण्यात येत आहे. एटीएसचे अधिकारी शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु असून अनेक जबाब देखील घेण्यात आले आहेत. कोर्टात एटीएसने तब्बल ४ पानांचा अहवाल दिला असून त्यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. NIA कोर्टातून सचिन वाझे यांचा ताबा मिळावा या करता एटीएसने ठाणे कोर्टातून परवानगी देखील मिळवली आहे

संबंधित माहिती

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

पुढील लेख
Show comments