एका जाहीर कार्यक्रमात पंतप्रधान मोदींची स्तुती केल्यामुळे कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव नरसय्या आडम त्यांच्यावर कारवाई करीत पक्षाने केंद्रीय कमिटीतून निलंबित केले आहे.
सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात अडाम यांनी मोदींचे कौतुक केले. मात्र, अशी स्तुती करणे हे कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारे असल्याने आडम यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. त्यानुसार, आडम यांना पुढील तीन महिन्यांसाठी केंद्रीय कमिटीतून निलंबित करण्यात आले आहे.