Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 29 April 2025
webdunia

पाकिस्तानात दहशतवादी मारायला गेले होते की झाडे उपटण्यासाठी, सिद्धूची वायफळ बडबड

navjot siddhu tweet on air strike
, सोमवार, 4 मार्च 2019 (14:15 IST)
नवजोत सिंह सिद्धू नेहमी आपल्याला वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. पुलवामा हल्ल्यानंतर एका वक्तव्यामुळे सिद्धू सोशल मीडियावर ट्रोल झाले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना 'द कपिल शर्मा शो' मधून बाहेर काढण्यात आले. 
 
आता पुन्हा सिद्धूने असे काही भाषण केले आहे ज्यामुळे पुन्हा त्याची थू-थू होऊ शकते. आता त्यांनी वायू सेनेच्या एअर स्ट्राइकवर प्रश्न केला आहे.
 
एअर स्ट्राइकवर राजकारण सुरू झाले असून पक्ष-विपक्ष यावर वाद घालत आहे. निवडणूक मंचावरून एकमेकांवर शब्दांचे वार सुरू आहेत. अनेक विपक्षी नेते एअर स्ट्राइकचा पुरावा हवा असे बोलले आहेत. आता ये यादीत काँग्रेस नेता नवजोत सिंह सिद्धूचे नाव देखील जुळले आहे. सिद्धूने विचारले की तेथे 300 दहशतवादी ठार झाले आहे की नाही? की केवळ झाडे उपटण्यासाठी गेले होते?
 
नवजोत सिंह सिद्धूने ट्विट करत लिहिले की, '300 दहशतवादी ठार झाले 'होय वा नाही', तेथे दहशतवाद्यांना मारण्यासाठी गेले होते की केवळ झाडे उपटण्यासाठी, काय ही केवळ एक निवडणुक नौटंकी होती. सेनेचं राजकारण करणे बंद करा, जेवढं पवित्र देश आहे तेवढीच पवित्र सेना आहे. उंच दुकान, फिकट पक्वान्न.

यापूर्वी सिद्धूने एक व्हिडिओ ट्विट केले. यात बालाकोट येथील स्थानिक रहिवासी म्हणत होते की येथे काहीही घडले नाही. या व्हिडिओसह सिद्धूने कॅप्शनमध्ये लिहिले- क्या मिलिए ऐसे लोगों से जिनकी फितरत छुपी रहे, नकली चेहरा सामने आए असली सूरत छुपी रहे.
 
पुलवामा हल्ल्यानंतर सिद्धूने म्हटले होते की दहशतवादी हल्ल्यामुळे कोणत्या देशाला पूर्णपणे जवाबदार ठरवणे योग्य नाही. यानंतर सिद्धू ट्रोल झाले होते. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अखेर वादग्रस्त ठरलेला नाणार प्रकल्प रद्द झाल्याची अधिसूचना राजपत्रात प्रकाशित