Dharma Sangrah

मोदी आणि कमळाच्या नावाने ते मागा : शहा

Webdunia
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018 (11:39 IST)
कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. दरम्यान, इथे पक्षाचा कोण उेदवार उभा आहे हे विसरून जा, त्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नावाने लोकांकडे ते मागा अशा स्पष्ट सूचना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केल्या आहेत. यावेळी शहा यांच्याकडून सोशल मीडियाबाबतची निवडणूक रणनीतीदेखील अंतिम करण्यात आली.
 
शहा यांचा नुकताच दोनदिवसीय कर्नाटक दौरा पार पडला. यावेळी त्यांनी दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बंटवाल येथील तदान केंद्रांवरील कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी तदान केंद्राप्रमाणे मेहनत घेण्याच्या सूचना पक्ष कार्यकर्त्यांना केल्या आहेत. ते म्हणाले, उेदवाराला विसरुन जा, तुम्ही ङ्ख्रत कळाच्या चिन्हाकडे आणि मोदींच्या फोटोकडे लक्ष द्या. तुमचे काम हे केवळ विधानसभा मतदारसंघ निवडून आणणे हेच असणार नाही तर तुमच्या केंद्रावरही विजय मिळवणे असणार आहे. 
 
ज्यावेळी अशा प्रकारचे अनेक केंद्र तुम्ही जिंकून आणाल तेव्हाच आपण निवडणूक जिंकू, असा धडा यावेळी शहा यांनी कार्यकर्त्यांना दिला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

पुढील लेख
Show comments