पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर व्यंगचित्रातून निशाणा

शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018 (11:37 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर व्यंगचित्राद्वारे निशाणा साधला आहे. आज भाऊबीज, या सणाचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. 2014 साली देशवासीयांना खोटी आश्वासनं देऊन भाजपा सत्तेवर आली, यावर भाष्य करणारे व्यंगचित्र राज यांनी साकारले आहे. 
 
आजच्या व्यंगचित्रात त्यांनी भारतमाता आणि पंतप्रधान मोदींना दाखवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ओवाळणीसाठी पाटावर बसले आहेत आणि भारतमाता रुसून त्यांच्याकडे पाठ करुन उभी आहे. भारतमाता मोदींना म्हणतेय की, 'गेल्या वेळेस ओवाळले...पण आता यापुढे नाही ओवाळणार !' म्हणजे 2014मध्ये आश्वासनांची बरसात करुन भाजपा सत्तेत आली. पण आता 2019 तसं काहीही होणार नाही, असे टीकास्त्र राज ठाकरे यांनी सोडले आहे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख तमिळनाडूत सर्व जागांवर लढणार : कमल हसन