Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुखर्जींच्या मृत्यूची चौकशी नेहरुंनी केलीच नाही

मुखर्जींच्या मृत्यूची चौकशी नेहरुंनी केलीच नाही
नवी दिल्ली , सोमवार, 24 जून 2019 (11:25 IST)
भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या गूढ मृत्यूच्या चौकशीचे आदेश पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिलेच नव्हते, असा गंभीर आरोप भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केला आहे. काश्मीर येथे कैदेत श्यामाप्रसाद मुखर्जींचा संशयास्पद मृत्यू झाला होता.
 
1953 मध्ये कलम 370 चा विरोध करण्यासाठी काश्मीरच्या भूमीवर गेलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जींना काश्मीर पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले होते. दोन महिन्यांनी जम्मू -काश्मीर येथे कैदेतच श्यामाप्रसाद मुखर्जींचा संशयास्पद मृत्यू झाला होता. वारंवार मागणी होऊनही मुखर्जींच्या मृत्यूची केंद्र सरकार किंवा जम्मू-काश्मीर सरकारने चौकशी केली नव्हती. इतिहास साक्षी आहे, देशभरातून मागणी होत असतानाही, मुखर्जी यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश देशाचे दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिले नाहीत, अशी टीका ना यांनी केली आहे. 
 
मुखर्जी यांना रविवारी भारतीय जनता पार्टीकडून पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी श्यामाप्रसाद मुखर्जींच्या कार्याची महतीही नड्डा यांनी सांगितली. मुखर्जी यांनी जे कार्य केले, ते खूप महत्त्वपूर्ण आणि मोलाचे होते. त्यांच्या प्रयत्नामुंळेच पश्चिम बंगाल आणि काश्मीर आज भारताचे अविभाज्य घटक आहेत. मुखर्जींचे बलिदान कधीही विसरणार नाही.
 
भाजपचे कार्यकारी अध्यक्ष नड्डांसह भाजपतील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मुखर्जींना आदरांजली वाहिली. मुखर्जींची पुण्यतिथी भाजप बलिदान दिन म्हणून साजरी करते. देशाची एकता आणि अखंडता राखण्यासाठी मुखर्जींनी आयुष्य वेचले. श्रितशाली आणि अखंड भारतासाठी त्यांचे विचार नेहीच आम्हाला प्रेरण देत राहतील. महानदेशभक्त मुखर्जी यांना बलिदान दिनानिमित्त आदरांजली, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शेतकरी चिडला तर सत्तेची आसने जळून खाक होतील