Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पासपोर्ट नियमांमध्ये 7 मोठे बदल, प्रक्रिया झाली सोपी

Webdunia
भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने पासपोर्ट तयार करण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी नवीन नियम जारी केले आहे. आता साधू- संन्यासी, लग्नाविना जन्माला आलेले मुलं, सिंगल पेरेंट्स मुलं आणि अनाथ मुलांचे पासपोर्ट बनवणे सोपे झाले आहे. तसेच आई आणि वडील दोघांचे नाव देणे अनिवार्य नसणार.
काय-काय बदलले?
पूर्वी 26/01/1989 नंतर जन्मलेल्या लोकांचे जन्म प्रमाण पत्र देणे आवश्यक होते. आता जन्मतिथीसाठी शाळेचा टीसी, पॅन कार्ड किंवा आधार कार्डवर अंकित जन्म तारीख, ड्रायविंग लायसेंस, मतदाता पहचान पत्र, विमा पॉलिसीही मान्य असेल.
 
आता पासपोर्ट आवेदनामध्ये आई किंवा वडिलांमधून एकाचे नाव किंवा कायद्याने पालकांचे नाव देणे अनिवार्य असेल. याने सिंगल परेंटही आपल्या मुलांच्या पासपोर्टसाठी आवेदन करू शकतात.
 
विवाहित लोकांना आता विवाह प्रमाण पत्र किंवा Annexure 'K' देण्याची गरज नाही. घटस्फोट झालेल्यांना पार्टनरचे नाव देण्याची गरज नाही.
 
अनाथ मुलं ज्यांच्याकडे जन्म प्रमाण पत्र किंवा जन्मतिथी अंकित मार्कशीट नसेल तेही अनाथाश्रम किंवा संस्थेच्या लेटर पॅडवर संस्थान प्रमुखाची साइनसह जन्मतिथी देऊ शकतात.
 
लग्नाविना जन्माला आलेल्या मुलांना आता पासपोर्टसाठी आवेदनासह केवळ Annexure G लावावे लागेल.
 
शासकीय कर्मचारी ओळखपत्र किंवा आपल्या संस्थानाकडून अनापत्ति प्रमाण पत्र घेऊ पात नाहीये ते आणीबाणीच्या स्थिती पासपोर्टसाठी स्वघोषित Annexure-'N' जमा करवू शकता. त्यांना केवळ आपल्या पासपोर्ट आवेदनाची माहिती संस्थानाला असल्याची घोषणा करावी लागेल.
 
साधू- संन्यासी आता केवळ आपल्या गुरुचे नाव पालकाच्या रूपात देऊन पासपोर्टसाठी आवेदन करू शकतात. यासाठी पालकाच्या रूपात आध्यात्मिक गुरुचे नाव असलेले प्रमाण पत्र असणे आवश्यक आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments