मुंबई : हवामान विभागाकडून मोठी अपडेट समोर आली आहे. विकेण्डआधी टेन्शन वाढवणारी बातमी आहे. त्यामुळे तुम्ही काम असेल तरच घराबाहेर पडा.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात दोन ठिकाणी हिटवेवचा अलर्ट देण्यात आला आहे. हा हिटवेवचा त्रास होऊ नये यासाठी काय गाइडलाइन्स आहे जाणून घ्या.
मध्य महाराष्ट्र विदर्भ, छत्तीसगड इथे पुढचे दोन दिवस हिटवेवचा अलर्ट देण्यात आला आहे. 2 आणि 3 जूनला लोकांनी विशेष काळजी घ्यावी असं यामध्ये म्हटलं आहे.
हवामान विभागाने घराबाहेर पडणाऱ्या लोकांसाठी गाइडलाईन्स जारी केल्या आहेत. कॉटन कपडे, होममेड ड्रिंक्स, घेणं आवश्यक आहे. ज्यामुळे डिहाड्रेशन होणार नाही.