निवडणूक आयोगाकडून 28 नोव्हेंबर रोजी होणार्या मिझोरम विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी करणत आली आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे.
या अधिसूचनेनुसार उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर आहे. 12 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 14 नोव्हेंबर आहे. मतमोजणी 11 डिसेंबर रोजी होणार आहे. 40 सदस्संख्या असलेल्या ईशान्य भारतातील मिझोरममध्ये सध्या काँग्रेसची सत्ता आहे. 15 डिसेंबर रोजी या विधानसभेची मुदत संपत आहे.