* NMACC मध्ये गुरूंचा आदर म्हणून उत्सव परंपरा' साजरा केला जात आहे
* पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरी वाजवली आणि पं. कार्तिक कुमार यांनी सतार वादनाने भुरळ घातली.
* NMACC मध्ये उस्ताद अमजद अली खान यांच्या तीन पिढ्यां एकत्र सादरीकरण करणार आहे
Mumbai News: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालिका नीता अंबानी यांनी रिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांना नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये आपले गुरू म्हटले आहे. गुरूंच्या स्मरणार्थ परंपरा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नीता अंबानी यांनीही देशवासियांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
प्रदर्शनाच्या उद्घाटनाला भारतीय शास्त्रीय संगीतातील दिग्गज - पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि पं. कार्तिक कुमार यांच्यासह त्यांचे शिष्य राकेश चौरसिया आणि निलाद्री कुमार उपस्थित होते.
सुमारे 2000 च्या जवळ प्रेक्षकांना संबोधित करताना, नीता अंबानी यांनी त्यांचे सासरे धीरूभाई यांना साधे मनाचे गुरु म्हणून स्मरण केले. पप्पा (धीरूभाई अंबानी) त्यांच्या सोप्या शैलीत प्रश्न विचारायचे, कधी कधी मी त्या प्रश्नांना घाबरून जायचे, पण आज मला वाटते की त्या प्रश्नांनीच मला जीवनाचा मार्ग शिकवला.
त्या म्हणाल्या की, धीरूभाईंनी मला मोठी दृष्टी दिली. प्रत्येक स्वप्न शिस्तीने आणि कठोर परिश्रमाने पूर्ण होऊ शकते हे त्यांनी शिकवले. त्यांनी मला नातेसंबंधांची कदर करायला शिकवले.
पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा आज 85 वा वाढदिवस होता. त्यांनी बासरीवर हॅपी बर्थडेची धून वाजवून हे क्षण संस्मरणीय बनवले. उपस्थितांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले.
'तीन पिढ्या - एक वारसा' थ्री जेनरेशन- वन लिगेसी' हा परंपरा उत्सव रविवारीही सुरू राहणार आहे. या मध्ये पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान आणि त्यांची मुले अमान अली बंगश आणि अयान अली बंगश तसेच उस्तादअमजद अली खान यांचे नातू - 10 वर्षांचे जुळे झोहान आणि अबीर अली बंगश हे एकत्र येणार.