Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मूग-सूरमधील फरक न कळणारे आता शेती शिकवताहेत : मोदी

मूग-सूरमधील फरक न कळणारे आता शेती शिकवताहेत : मोदी
जयपूर , गुरूवार, 29 नोव्हेंबर 2018 (11:41 IST)
'ज्यांना मूग आणि मसूरमधला फरक कळत नाही, ते आता देशातील शेतकर्‍यांना शेती शिकवताहेत, अशी बोचरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव न घेता केली.
 
राजस्थान विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूीवर नागौर मतदारसंघात जनतेला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते. 'काही नामदारांना चण्याचे रोपटे असते की झाड असते, हे देखील माहिती नाही. मूग आणि मसूरधील फरक कळत नाही, ते आता शेती कशी करायची याचे धडे देत आहेत,' असा टोला मोदींनी हाणला.
 
'सबका साथ, सबका विकास'चा मंत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांच्याकडून मिळाला आहे. जन्माला येताच सर्व काही मिळत नाही. आम्ही आमच्या स्वार्थासाठी नाही, तर जनतेच्या विकासासाठी मत मागत आहोत, असेही ते म्हणाले.
 
श्रम आणि शौर्याच्या या भूमीवर एका कामदाराची लढाई एका नामदाराशी आहे. चुलीवर अन्न कसे शिजवले जाते, हे नामदारांना माहिती नाही. धुरामुळे डोळ्यांना होणारा त्रास त्यांनी कधी अनुभवला नाही. या गोष्टी मी अनुभवल्या आहेत. मी देखील तुमच्यामधीलच एक आहे. तुमच्या एका मतामुळे संपूर्ण देशवासियांचे कल्याण होणार आहे, असे ते म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास : अजित पवार