Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुजरात मध्ये पकडल्या जुन्या लाखो रुपयांच्या नोटा

Webdunia
एका बाजूला जुन्या नोटा बदलणे कधीच बंद झाले असताना अजूनही छुप्या मार्गाने नोटा बदली सुरु आहे. असाच काहीसा प्रकार गुजरातच्या अहमदाबादमध्ये घडला आहे. यामध्ये  पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये 41 लाख 49 हजार रुपये मूल्याच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
 
पहिल्या घटनेत पोलिसांनी संशयावरून एक कार अडवली. तपासणीवेळी कारमध्ये चलनातून रद्द झालेल्या 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपातील 36 लाख 99 हजार रुपये आढळले. कारमधील तिघांना ताब्यात घेण्यात आले. एका प्रॉपर्टी डिलरची संबंधित रोकड बदलून घेण्यासाठी जात असल्याची कबुली त्यांनी दिली. दुसऱ्या घटनेत पोलिसांनी दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1 हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपातील 4 लाख 50 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. गुजरात पुलिस चौकशी करत असून यामागे कोण आहे आणि अजून किती  नोटा आहेत याचा तपास करत आहे.

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुण्यात भरधाव वेगात असलेल्या आलिशान कारने दुचाकीला धडक दिली, दोघांचा मृत्यू

SRH vs PBKS : आजच्या सामन्यात हैदराबादची नजर दुसऱ्या स्थानावर असेल

Lok sabha elections 2024 : भाजपला आता आरएसएसची गरज नाही,उद्या ते आरएसएसला नकली म्हणतील- उद्धव ठाकरे

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

पुढील लेख
Show comments