भारतात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला आहे. आता भारतही या जागतिक आरोग्य संकटाचा बळी ठरू शकतो. आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि स्क्रीनिंग आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्याचे सांगितले आहे.
जगभरात झपाट्याने पसरणाऱ्या मंकीपॉक्स (Mpox) या धोकादायक आजाराचा धोका भारतातही दिसू लागला आहे. त्याचा पहिला रुग्ण भारतात सापडला आहे. या धोकादायक आजाराचा विषाणू आफ्रिकेतून उद्भवला असून तो युरोप आणि अमेरिकेत पोहोचला आहे. आता भारतात देखील या रुग्णाचा शिरकाव झाला असून एका संशयिताला आयसोलेट ठेवण्यात आले आहे.
केंद्र सरकारने सोमवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना समुदाय स्तरावर मंकीपॉक्सच्या सर्व संशयित प्रकरणांची तपासणी आणि चाचणी घेण्याचा सल्ला दिला आणि रुग्णाच्या तपासणीच्या अहवालात पुष्टी झाल्यावर त्याला आयसोलेट करण्याचा सल्ला दिला.