Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्राण्यांनाही मिळणार कोरोनाची लस

Webdunia
शुक्रवार, 10 जून 2022 (13:35 IST)
केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमरयांनी गुरुवारी प्राण्यांसाठी विकसित केलेली देशातील पहिली अँटी-कोविड लस 'अ‍ॅनोकोव्हॅक्स' (Enokovax)लाँच केली. ही लस आयसीएआर-नॅशनल रिसर्च सेंटर ऑन इक्विन्सने (NRC)विकसित केली आहे. ही लस कुत्री, सिंह, बिबट्या, उंदीर आणि ससे यांच्यासाठी सुरक्षित आहे. माणसांसाठी लस विकसित केल्यानंतर प्राण्यासांठीही भारतीय शास्त्रज्ञांनी लस विकसित केली आहे हे मोठे यश आहे. 
 
यासोबतच तोमरने कुत्र्यांमधील SARS-Cov-2 विरुद्ध प्रतिपिंडे शोधण्यासाठी Can-Cov-2 ELISA किट देखील लाँच केली. हे अप्रत्यक्ष ELISA किट आधारित एक विशेष न्यूक्लियोकॅप्सिड प्रोटीन आहे. हे किट भारतात बनवण्यात आले असून त्यासाठी पेटंटही दाखल करण्यात आले आहे. मंत्र्यांनी घोड्यांमधील पालकत्व विश्लेषणासाठी एक शक्तिशाली जीनोमिक तंत्र, इक्वीन डीएनए पॅरेंटेज टेस्टिंग किट देखील लॉन्च केले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments