पाकिस्तानच्या ताब्यात असलेले कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवणं हे सर्वात आधी महत्त्वाचं आहे. मोदी सरकारने आपली सर्व शक्ती पणाला लावून, कुलभूषण जाधव यांना परत आणावं, असं एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी म्हणाले. “मला कुलभूषण जाधवप्रकरणाचं राजकारण करायचं नाही. सरकाने दबावतंत्र वापरावं. मोदी सरकारने सर्व शक्ती पणाला लावून कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवावा. प्रसंग आंतरराष्ट्रीय दबाव टाकावा. आता कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवणं हेच आपलं ध्येय हवं” असं ओवेसी म्हणाले.