Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अशी झाली ‘बाहुबली सर्जरी’

Webdunia
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017 (17:12 IST)

आंध्र प्रदेशमधील गुंटूर शहरातील तुलसी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात अनोखी शस्त्रक्रिया पार पडली. नाव पडल  ‘बाहुबली सर्जरी.’   यात डॉक्टर शस्त्रक्रिया करत असताना रुग्ण चक्क ‘बाहुबली २’ चित्रपट पाहत होती.

व्यवसायाने नर्स असलेल्या ४३ वर्षीय विनया कुमारी यांना ब्रेन ट्युमर झाला होता. काही दिवसांपूर्वी चक्कर येऊन त्या पडल्या. तपासणी केल्यानंतर ब्रेन ट्युमर झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. त्यांच्यावर गेल्या आठवड्यात  ९० मिनिटांची शस्त्रक्रिया करण्यात आली. तुलसी सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील न्यूरोसर्जनच्या टीमने त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेदरम्यान विनया यांनी शुद्धीत राहणं जास्त गरजेचं होतं, तेव्हा तिचं मन गुंतवून ठेवण्यासाठी डॉक्टरांनी ऑपरेशन थिएटरमध्ये चक्क बाहुबली चित्रपट दाखवला. यासाठी तिच्या बेडवर लॅपटॉपची व्यवस्था करण्यात आली होती. तिच्या योग्य प्रतिसादामुळे डॉक्टरांच्या चमूला तिच्यावर उपचार करणं अधिक सोपं गेलं. 

संबंधित माहिती

KKR vs SRH सामन्यात पाऊस पडला तर IPL फायनलचे तिकीट कोणत्या संघाला मिळेल? तपशीलवार जाणून घ्या

T20 World Cup 2024:भारत पहिल्यांदाच या संघांशी भिडणार, जाणून घ्या सामना कधी होणार

मुंबईत पक्ष्यांच्या कळपावर विमानाची धडक लागून 40 फ्लेमिंगोचा मृत्यू

परळी मध्ये उष्माघाताने भाजीविक्रेताचा मृत्यू

SRH vs KKR : कोलकाता आणि हैदराबाद अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या इराद्याने समोर येणार

पुढील लेख
Show comments