Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देशात प्रथमच दिसला गुलाबी बिबट्या, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Webdunia
शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 (11:40 IST)
जंगलाचे जग खरोखरच अनोखे आहे. विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी येथे राहतात. परंतु काही  प्राणी इतके दुर्मिळ असतात की त्यांना जंगलात शोधणे कठीण होते. अशा प्रजातींना सामान्यतः धोक्यात आलेले प्राणी मानतात. पण ते जंगलात दिसले की लोकांना आनंद होतो. या दिवसांत पुन्हा असाच एक प्राणी जंगलात दिसला, जो बराच काळ दिसत नव्हता. त्यामुळे आता ही बातमी लोकांच्या उत्सुकतेचे कारण बनली आहे.
 
एका रिपोर्टनुसार, यावेळी जंगलात प्रथमच गुलाबी बिबट्या(Pink Leopard) दिसला, ज्याचा लोकांनी फारसा विचार केला नसेल. हा बिबट्या दक्षिण राजस्थानच्या अरवली डोंगराळ भागात रणकपूर परिसरात दिसला . एका अहवालानुसार, यापूर्वी 2012 आणि 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेत गुलाबी बिबट्या दिसला होता. पांढरा बिबट्या भारतात पहिल्यांदा 1910 मध्ये दिसला होता, तेव्हापासून फक्त सामान्य आणि काळा बिबट्या दिसत होता. या पार्श्वभूमीवर ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे.

<

Rare pink leopard sighted in Ranakpur hills of Rajasthan (For global #wildlife #news, visit #wildtrails at https://t.co/qdysMKANMv) pic.twitter.com/XE34LVcgBb

— WildTrails.in (@_WildTrails) November 10, 2021 >रणकपूर आणि कुंभलगढच्या लोकांनी असेही सांगितले की त्यांनी त्यांच्या भागात एक मोठी मांजर(Big Cat)  अनेकदा पाहिली आहे, ज्याचा रंग गुलाबी आहे. उदयपूरचे वन्यजीव संरक्षक आणि छायाचित्रकार हितेश मोटवानी यांनी ही छायाचित्रे क्लिक केल्याचे सांगितले. ही छायाचित्रे क्लिक करण्यासाठी हितेश चार दिवस प्रवास करत असताना त्यांना गुलाबी बिबट्या दिसला. आनुवंशिकतेमुळे बिबट्याचा रंग गुलाबी होतो. पण गुलाबी बिबट्या क्वचितच दिसतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments