Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अनलॉक २ ची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अनलॉक २ ची घोषणा
Webdunia
मंगळवार, 30 जून 2020 (16:44 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून (PM Narendra Modi)अनलॉक २ ची घोषणा करण्यात आली आहे. आपण करोनाशी लढताना आता अनलॉक २ मध्ये प्रवेश करतो आहोत. अशात पावसाळा आला आहे तेव्हा स्वतःची काळजी घ्या असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 
 
वेळेवर केलेलं लॉकडाउन आणि इतर महत्त्वाचे निर्णय यामुळे भारतात करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहिला. अनलॉक १ मध्ये काही प्रमाणात निष्काळजीपणा वाढताना पाहण्यास मिळाला. हे योग्य नाही असंही मोदींनी म्हटलं आहे. लॉकडाउन सुरु झाल्यानंतर अत्यंत गांभीर्याने नियमांचं पालन करण्यात आलं. आता पुन्हा एकदा राज्य सरकारांना, देशाच्या नागरिकांना आणि संस्थांना अशाच प्रकारची सतर्कता बाळगणं गरजेचं आहे.
 
खास करुन कंटेटमेन्ट झोनची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. आपल्याला नियम न पाळणाऱ्या लोकांना रोखावं लागेल आणि त्यांना नियमांचं महत्त्व समजावून लागेल असंही मोदींनी (PM Narendra Modi) म्हटलं आहे. जगातल्या इतर देशांच्या तुलनेत भारतातली परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र आता अनलॉक २ सुरु करताना आपल्याला अधिक काळजी घ्यायची आहे. निष्काळजीपणा करु नका असंही त्यांनी सांगितलं आहे. आज व्हिडीओच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाशी संवाद साधला.
 
३० नोव्हेंबर पर्यंत ८० कोटी भारतीयांना मोफत धान्य देणार
 
३० नोव्हेंबरपर्यंत गरीबांना धान्य मोफत दिलं जाणार आहे अशी अत्यंत महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (pm gareeb kalyan anna yojana will be extended)केली आहे. याचा लाभ देशातल्या ८० कोटी जनतेला होणार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर संपूर्ण देशात वन नेशन वन रेशन कार्ड योजनाही  (pm gareeb kalyan anna yojana will be extended) लवकरच लागू केली जाणार आहे अशीही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. जे करदाते आहेत त्यांना मी अभिवादन करतो त्यांनी प्रामाणिकपणे त्यांचा कर भरला त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो असंही मोदींनी (PM Modi) म्हटलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पापमोचनी एकादशी २०२५: योग्य तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

मंगळसूत्र आणि भांग भरणे विधी

शनी गोचरमुळे या ३ राशींचे भाग्य बदलेल, सूर्य आणि बुध ग्रहाच्या कृपेने ते होतील श्रीमंत

श्री अक्षरावरून मुलांची नावे अर्थासकट

तेनालीराम कहाणी : तेनाली राम आणि रसगुल्लाचे मूळ

पुढील लेख
Show comments