PM Modi in Mann KI Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 101 व्यांदा मन की बात कार्यक्रमाद्वारे देशवासियांना संबोधित केले. पुढील 25 वर्षे देशासाठी महत्त्वाची असल्याचे सांगून त्यांनी लोकसहभाग ही देशाची सर्वात मोठी ताकद असल्याचे सांगितले. वीर सावरकरांचे स्मरण करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांच्या कथा सर्वांना प्रेरणा देतात.
मन की बातच्या माध्यमातून अनेक लोक एका व्यासपीठावर एकत्र आल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, यापूर्वी आम्ही मन की बातमध्ये काशी तमिळ संगमबद्दल बोललो होतो. सौराष्ट्र तमिळ संगमबद्दल बोललो. काही काळापूर्वी वाराणसीमध्ये काशी तेलुगू संगमही झाला होता. एक भारत या महान भावनेला बळ देण्यासाठी देशात असाच एक अनोखा प्रयत्न करण्यात आला आहे. युवा संगमचा हा प्रयत्न आहे.
पीएम मोदी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी मी जपानमधील हिरोशिमा येथे होतो. तिथे मला हिरोशिमा पीस मेमोरियल म्युझियमला भेट देण्याची संधी मिळाली. तो एक भावनिक अनुभव होता. जेव्हा आपण इतिहासाच्या आठवणी जपतो तेव्हा त्याचा येणाऱ्या पिढ्यांना खूप फायदा होतो.
काही दिवसांपूर्वी भारतात आंतरराष्ट्रीय संग्रहालयाचेही आयोजन करण्यात आले होते. यात जगातील 1200 हून अधिक संग्रहालयांचे वैशिष्टये होते.
पंतप्रधान म्हणाले की, 'मन की बात'चा हा भाग दुसऱ्या शतकाची सुरुवात आहे. गेल्या महिन्यात आपण सर्वांनी त्याचे खास शतक साजरे केले. तुमचा सहभाग ही या कार्यक्रमाची सर्वात मोठी ताकद आहे.
पंतप्रधान म्हणाले की जेव्हा 'मन की बात' प्रसारित झाली, त्या वेळी जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगवेगळ्या टाइम झोनमध्ये... कुठेतरी संध्याकाळ झाली होती तर कुठे रात्र झाली होती. असे असूनही, मोठ्या संख्येने लोकांनी 100 वा भाग ऐकण्यासाठी वेळ काढला. मी न्यूझीलंडचा तो व्हिडिओ पाहिला ज्यात 100 वर्षांच्या माउली आशीर्वाद देत होत्या.