Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

PM मोदी जगातील सर्वोत्कृष्ठ नेते, बघा ग्लोबल अप्रूवल रेटिंग

PM मोदी जगातील सर्वोत्कृष्ठ नेते, बघा ग्लोबल अप्रूवल रेटिंग
, शुक्रवार, 18 जून 2021 (09:48 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कोरोना काळातही कायम आहे आणि ते जगातील सर्वात स्वीकृत नेते ठरले आहेत. अमेरिकेतील डेटा इंटेलिजेंस फर्म 'मॉर्निंग कंसल्ट' द्वारे केलेल्या सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'Global Leader Approval ' म्हणून स्विकारलं आहे.  मोदी जागतिक इतर नेत्यांपेक्षा पुढे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जागतिक पातळीवरील रेटिंग रेटिंग 66 टक्के आहे. आकडेवारीनुसार, कोरोना काळातही पंतप्रधान, अमेरिका, ब्रिटन, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनी या 13 देशांच्या इतर नेत्यांपेक्षा अव्वल ठरले आहेत. 
 
अमेरिका डेटा इंटेलिजेंस फर्म 'मॉर्निंग कंसल्ट' द्वारे केलेल्या सर्वेक्षणात, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोदींची लोकप्रियता आणि अप्रूवल रेटिंगमध्ये घसरण पाहायला मिळाली. असं असलं तरीही मोदी यादीत टॉपवरच आहेत. इतर नेत्यांच्या तुलनेत त्यांचं काम चांगल आहे. या अप्रूवल रेटिंगमध्ये मोदींच्या पाठोपाठ इटलीचे पंतप्रधान मारियो ड्रॅग यांचा नंबर लागतो. ज्यांची अप्रूवल रेटिंग 65 टक्के आहेत. तिसऱ्या क्रमांकावर मेक्सिकोचं राष्ट्रपती लोपेज ओब्रेडोर असून त्यांची रेटिंग 63 टक्के आहे. 
 
जागतिक नेत्यांचे रेटिंग
'मॉर्निंग कंसल्ट' नियमितपणे जागतिक नेत्यांच्या अप्रूवल रेटिंग ट्रॅक करत असतं. त्यानुसार पंतप्रधान मारिओ ड्रॅगी (65%) यांनी पीएम मोदी नंतर दुसरे स्थान मिळविले, त्यानंतर मेक्सिकनचे अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर (63%), ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (54%), जर्मन चांसलर अँजेला मर्केल (53 %), अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन (53%), कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो (48%), ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन (44%), दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे-इन (37%), स्पॅनिश अध्यक्ष पेद्रो सान्चेझ (36%), ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सनोरो (35%), फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (35%) आणि जपानचे पंतप्रधान योशिहाइड सुगा (29%) स्थानावर आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काँग्रेस स्वतंत्र लढल्यास राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र लढेल