Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Modi Resignation: नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा, राष्ट्रपतींना पत्र सादर

Modi Resignation: नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा, राष्ट्रपतींना पत्र सादर
, बुधवार, 5 जून 2024 (14:56 IST)
नरेंद्र मोदी यांनी बुधवार, 5 जून रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन मंत्रिपरिषदेसह राजीनामा सादर केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजीनामा स्वीकारला आहे. त्यांनी नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाला नवीन सरकार येईपर्यंत पदावर राहण्याची विनंती केली आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी मोदी मंत्रिमंडळाने 17वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस केली होती.
 
या तारखेला मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत 17वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस करण्यात आली. सध्याच्या 17व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून रोजी संपत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 जून रोजी संसदीय पक्षाची बैठक होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 जून रोजी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होऊ शकतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चंद्रबाबू नायडूंच्या हो नंतर शेअर मार्केट मध्ये आली शोभा, सेंसेक्स आणि निफ्टी दोन्ही फ्रफुल्लीत