भारताच्या राष्ट्रपतीपदाची निवडणुक 17 जुलै रोजी होणार असल्याचे निवडणुक आयोगाने जाहीर केले आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीची मतमोजणी 20 जुलै रोजी होणार आहे. राष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल करण्याची तारिख 14 जून आहे. तर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 28 जून असेल. 29 जून रोजी आलेल्या अर्जाची पडताळणी करण्याच येईल. अर्ज माघारी घेण्याची मुदत 1 जुलै असेल्याचे निवडणुक आयोगाने स्पष्ट केले. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी व्हीप नसल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने यावेळी स्पष्ट केले. 24 जुलै रोजी विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ संपत आहे.
राष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया :
– उमेदवाराच्या अर्जावर ५० प्रस्तावक, ५० अनुमोदक असणं गरजेचं.
– उमेदवाराला निवडणुकीसाठी १५ हजार रूपये अनामत रक्कम जमा करावी लागणार.
– संसद, राज्यांच्या विधानसभा, दिल्ली व पुडुच्चेरी या केंद्रशासित राज्यांच्या विधानसभा या ठिकाणी मतदान होणार
– गुप्त मतदान पद्धतीनं निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल.
– निवडणूक आयोगानं दिलेल्या विशेष पेनानंच मतदान केलं जाईल.
– यात मतदारांना पसंती क्रम द्यायचे असतात ( १ ते… जितके उमेदवार)
– राजकीय पक्ष या निवडणुकीसाठी कुठलाही व्हिप जारी करू शकत नाही.
– लोकसभेचे सेक्रेटरी जनरल, राज्यसभेचे सेक्रेटरी जनरल हे संसदेच्या मतदानासाठी निवडणूक अधिकारी