Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता राष्‍ट्रपती ‘भाजप’च्याच पसंतीचाच होणार!

Webdunia
सोमवार, 13 मार्च 2017 (09:30 IST)
जाणून घ्या कशी असते राष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया?
पाच राज्‍यांच्‍या विधानसभा निवडणुकांमध्‍ये भाजपाला घवघवीत यश मिळाले आहे. यामुळे राज्‍यसभेत अल्‍पमतात असलेल्‍या भाजपची स्थिती चांगलीच मजबुत होणार आहे.
 
संसदेच्‍या या वरिष्‍ठ सभागृहात बहुमत नसल्‍यामुळे अनेक विधेयकांच्‍या मंजुरीसाठी भाजपाला विरोधकांवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र उत्‍तर प्रदेश आणि उत्‍तराखंडमध्‍ये भाजपच्‍या विधानसभेच्‍या जागांमध्‍ये भरघोस वाढ झाल्‍यामुळे राज्‍यसभेतील जागांचे आकडे बदलणार आहे. तज्‍ज्ञांच्‍या मते राज्‍यसभेत स्‍वत:च्‍या मर्जीचा राष्‍ट्रपती ठरवण्‍याइतपत भाजपची सदस्‍यसंख्‍या वाढू शकते.
 
कसा होणार राष्‍ट्रपती निवडणुकीवर परिणाम?
लोकसभा आणि राज्‍यसभेतील सर्व खासदार, देशातील सर्व विधानसभांमधील आमदार राष्‍ट्रपतींच्‍या निवडणुकीत मतदान करतात.
ही निवडणूक ज्याप्रकारे घेतली जाते त्यात प्रत्येक खासदार आणि आमदाराच्या मताची एक किंमत ठरलेली असते. ही किंमत (व्होट व्हॅल्यू) उत्तर प्रदेशच्या आमदारांची सर्वात जास्त आहे तर ईशान्य भागातील छोटेखानी राज्यातील आमदारांची सर्वात कमी आहे.
त्‍यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या आमदारांच्या मताचे सर्वाधिक महत्त्व असते. म्‍हणूनच उत्‍तरप्रदेशची निवडणूक राष्‍ट्रपतीपदाच्‍या निवडीसाठी तसेच संसदेच्‍या दोन्‍ही सभागृहात सरकारचे कामकाज सुरळीतपणे चालु ठेवण्‍यासाठी महत्‍त्‍वाची असते.
 
कशी ठरते मतांची किंमत?
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत प्रत्येक राज्यातील आमदार आणि खासदारांच्‍या मताची किंमत वेगवेगळी असते. त्यासाठी लोकसंख्या हा पाया धरला गेला आहे. त्याच आधारावर उत्तर प्रदेश मधल्या आमदारांच्या मताचे मूल्य गोव्याच्या आमदाराच्या मतापेक्षा जास्त आहे. खासदारांचे मुल्‍य आमदारांच्‍या मुल्‍यांपेक्षा अधिक असते.
 
असे आहे गणित
राष्‍ट्रपतींच्‍या निवडणुकीमध्‍ये एकूण 10,98,882 इतक्‍या व्‍होट व्‍हॅल्यूंचे मतदान होते.
त्‍यापैकी 5.49 लाख इतके व्होट व्हॅल्यू राष्‍ट्रपती निवडून येण्‍यासाठी आवश्‍यक असतात.
भाजपाजवळ निवडणुकीआधी 4.57 लाख मते होती. म्‍हणजेच आपल्‍या पसंतीचा राष्‍ट्रपती निवडून आणण्‍यासाठी त्‍यांना फक्‍त 92 हजार मतांची गरज होती.
पाच राज्‍यांमध्‍ये जिंकलेल्‍या विधानसभेच्‍या जागांमुळे भाजपच्‍या व्‍होट व्‍हॅल्‍युमध्‍ये 96508 इतकी वाढ झाली आहे. यातील फक्‍त उत्‍तरप्रदेशमधील मतांची किंमत 67600 आहे.
यामुळे भाजपाच्‍या पसंतीचा राष्‍ट्रपती बनणे आता जवळपास निश्चित झाले आहे.
लोकसभाअध्‍यक्षा सुमित्रा महाजन, सुषमा स्‍वराज आणि वेंकैया नायडू राष्‍ट्रपतीपदाच्‍या खुर्चीसाठी सध्‍या सर्वात पुढे आहेत.
मात्र उपराष्‍ट्रपतींच्‍या निवडणुकीवर या निकालांचा काहीही परिणाम होणार नाही. कारण उपराष्‍ट्रपतीच्‍या निवडीसाठी फक्‍त लोकसभा आणि राज्‍यसभेतील खासदारांचे मतदान होते.

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

पुढील लेख
Show comments