Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राष्ट्रपती निवडणूक : भुजबळ, कदम करणार मतदान

Webdunia
सोमवार, 17 जुलै 2017 (11:45 IST)
देशाच्या 14 व्या राष्ट्रपतीपदासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी मुंबईतही आमदारांचं मतदान होत आहे. विशेष म्हणजे जेलमध्ये असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि आमदार रमेश कदमही यांनाही मतदानाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे हे दोघेही मतदान करतील.
 
पैशांच्या अफरातफरीप्रकरणी छगन भुजबळ सध्या मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहेत. तर रमेश कदम हे अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणात भायखळा जेलमध्ये आहेत.
 
या दोघांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करु द्यावं, अशी मागणी पीएमएलए कोर्टाकडे केली होती. त्यांची ही मागणी मान्य झाली आहे. दरम्यान, भुजबळ आणि रमेश कदम यांना पोलिस संरक्षणात जेलमधून विधानसभेत मतदानासाठी नेण्यात येईल. तिथे मतदान झाल्यानंतर त्यांना पुन्हा जेलकडे नेण्यात येईल.
सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments