आपण लहान मुलांना शिकवण देतो की परीक्षेत कॉपी करू नये. पण जर मोठेच परीक्षेत कॉपी करू लागले तर काय म्हणावं. बिहारच्या भागलपूर विद्यापीठात कायद्याच्या परीक्षेत एका महिलेला परीक्षेत कॉपी करण्यापासून रोखल्यावर तिने शिक्षकालाच मारहाण केली. एवढेच नव्हे तर महिलेला रोखल्यावर तिने शिक्षकाचे कपडे फाडले आणि मध्यस्थी करणाऱ्या गार्डला देखील चापट मारली.
हा सर्व प्रकार आहे. बिहारच्या भागलपूर इथला. कायद्याच्या पदवीसाठी सहाव्या सेमेस्टरची परीक्षा सुरु असताना प्रीती कुमारी नावाच्या महिलेने आपल्या जवळ कॉपी करण्यासाठी एक पेपर ठेवला होता. शिक्षकाने तिला कॉपी करण्यापासून रोखल्यावर तिने गोंधळ सुरु केला. तिने शिक्षकाचा शर्ट धरून कपडे फाडले. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या गार्डवर देखील तिने आरडा-ओरड करत चापट मारली.
तिथे असलेल्या महिला पोलीसशी पण तिची बाचाबाची झाली. तिने पोलिसांच्या लाठ्या हिसकवून घेतल्या. ही महिला परीक्षा हॉल मध्ये सुमारे एक तास पूर्वीच आली होती.
शिक्षिकेने तिला बाहेर जाण्याचा आदेश दिल्यावर ती मान्य झाली नाही आणि परीक्षा हॉलमध्येच बसून राहिली. परीक्षा सुरू झाल्यावर कोणतीही भीती न बाळगता तिने कॉपीसाठी आणलेला पेपर काढला आणि प्रश्नांची उत्तरे लिहायला सुरुवात केली. तिला कॉपी करताना शिक्षिकेने पाहिल्यानंतर त्याने तिला रोखण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर महिले ने गोंधळ करायला सुरु केले. शिक्षकाने तिला रोखल्यावर तिने शिक्षकाचे कपडे फाडून महिलेने गार्डला चापट मारली. मात्र, या गोंधळानंतर महिला उमेदवाराला परीक्षेतून बाहेर काढण्यात आले. या घटनेचा अहवाल विद्यापीठाला पाठवला आहे.