Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंतप्रधान मोदींकडून राज्यातल्या जनतेला विशेष आव्हान

Webdunia
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020 (17:01 IST)
राज्यात रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यावर पंतप्रधान मोदी यांनी देखील याबाबत चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेला विशेष आव्हान केलं आहे.
 
पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, 'महाराष्ट्राच्या लोकांना एक गोष्ट विशेषपणे सांगू इच्छित आहे. कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. महाराष्ट्रात हे संकट जरा अधिक आहे. त्यामुळे माझं महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला प्रार्थना आहे की, चेहऱ्यावर मास्क, पुन्हा-पुन्हा हात धुणे, स्वच्छता ठेवणं, सोशल डिस्टंसिंग या नियमांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. जोपर्यंत औषध नाही, तोपर्यंत निष्काळाजीपणा नाही. ही लढाई नक्की जिंकू. जिंकायचीच आहे आणि जिंकणारच.'
 
भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुस्तकाचं प्रकाशनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं. यावेळी बोलताना त्यांनी बाळासाहेब विखे पाटील यांच्या कामाचं कौतूक केलं.
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments