Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, पाहा कोणते मंत्रिपद कोणाला मिळाले

Webdunia
सोमवार, 10 जून 2024 (21:19 IST)
नरेंद्र मोदी यांनी 9 जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या काळात पंतप्रधान मोदींसह एकूण 71 खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान, मोदी सरकार 3.0 मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक झाली. या बैठकीत मंत्र्यांच्या खात्यांचे वाटप करण्यात आले.
 
एकूण 71 मंत्र्यांना मंत्रालये देण्यात आली आहेत, जी तीन भागात विभागली गेली आहेत. 30 खासदारांना मंत्री, 5 खासदारांना स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि 36 जणांना राज्यमंत्री करण्यात आले आहे. 
या खातेवाटपमध्ये अनेक मंत्र्यांनात्यांची जुनी खाते देण्यात आली  आहे. 
मंत्रालये आणि मंत्रीची यादी

कॅबिनेट  
राजनाथ सिंह - संरक्षण मंत्री.
अमित शहा - गृहमंत्री आणि सहकार मंत्री.
नितीन जयराम गडकरी- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री.
जगत प्रकाश नड्डा- आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि रसायने आणि खते मंत्री.
शिवराज सिंह चौहान- कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आणि ग्रामविकास मंत्री.
निर्मला सीतारामन - अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री.
डॉ. सुब्रमण्यम जयशंकर- परराष्ट्र मंत्री.
मनोहर लाल- गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री आणि उर्जा मंत्री.
एच.डी. कुमारस्वामी- अवजड उद्योग मंत्री आणि पोलाद मंत्री.
पीयूष गोयल- वाणिज्य आणि उद्योग मंत्री.
धर्मेंद्र प्रधान- शिक्षण मंत्री.
जीतन राम मांझी- सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री.
राजीव रंजन सिंग उर्फ ​​ललन सिंग- पंचायती राज मंत्री आणि मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री.
सर्बानंद सोनोवाल बंदरे मंत्री- जहाज व जलमार्ग.
डॉ. वीरेंद्र कुमार- सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री.
किंजरापू राममोहन नायडू - नागरी विमान वाहतूक मंत्री.
प्रल्हाद जोशी- ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री.
जुआल ओरम - आदिवासी व्यवहार मंत्री.
गिरीराज सिंह - वस्त्रोद्योग मंत्री.
अश्विनी वैष्णव- रेल्वे मंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्री आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री.
ज्योतिरादित्य एम. सिंधिया- दळणवळण मंत्री आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री.
भूपेंद्र यादव- पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री.
गजेंद्र सिंह शेखावत- सांस्कृतिक मंत्री आणि पर्यटन मंत्री.
अन्नपूर्णा देवी - महिला आणि बाल विकास मंत्री
किरेन रिजिजू - संसदीय कामकाज मंत्री आणि अल्पसंख्याक कार्य मंत्री.
हरदीप सिंग पुरी- पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री, कामगार आणि रोजगार मंत्री आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री.
जी. किशन रेड्डी- कोळसा मंत्री आणि खाण मंत्री.
चिराग पासवान - अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री.
सी.आर. पाटील- जलशक्ती मंत्री.
मनसुख मांडविया - कामगार आणि रोजगार, युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री
 
राज्यमंत्री
जितीन प्रसाद - वाणिज्य आणि उद्योग,  इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (राज्यमंत्री)
श्रीपाद नाईक - ऊर्जा, अक्षय ऊर्जा मंत्रालय (राज्यमंत्री)
पंकज चौधरी - अर्थ मंत्रालय (राज्यमंत्री)
कृष्ण पाल -  सहकार मंत्रालय (राज्यमंत्री)
रामदास आठवले -  सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय (राज्यमंत्री)
रामनाथ ठाकूर -  कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय (राज्यमंत्री)
नित्यानंद राय - गृह मंत्रालय (राज्यमंत्री)
अनुप्रिया पटेल - आरोग्य आणि कुटुंब कल्याण, रसायने आणि खते मंत्रालय (राज्यमंत्री)
व्ही. सोमन्ना - जलशक्ती, रेल्वे मंत्रालय (राज्यमंत्री) 
चंद्रशेखर पेमसानी - ग्रामीण विकास, दळणवळण मंत्रालय (राज्यमंत्री)
एस.पी.सिंग बघेल - मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, पंचायती राज मंत्रालय (राज्यमंत्री)
शोभा करंदलाजे - सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, कामगार आणि रोजगार मंत्रालय (राज्यमंत्री)
कीर्तिवर्धन सिंह - पर्यावरण, वन आणि हवामान बदल, परराष्ट्र मंत्रालय (राज्यमंत्री)
बी. एल. वर्मा - ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय

राज्यमंत्री-
शंतनू ठाकूर - बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय (राज्यमंत्री)
सुरेश गोपी - पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, पर्यटन मंत्रालय (राज्यमंत्री)
डॉ. एल. मुरुगन - माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज मंत्रालय (राज्यमंत्री)
अजय टम्टा - रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (राज्यमंत्री)
बंदी संजय कुमार - गृह मंत्रालय (राज्यमंत्री)
कमलेश पासवान - ग्रामीण विकास मंत्रालय (राज्यमंत्री)
भगीरथ चौधरी - कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय (राज्यमंत्री)
सतीशचंद्र दुबे -  कोळसा आणि खाण मंत्रालय (राज्यमंत्री)
संजय सेठ - संरक्षण मंत्रालय (राज्यमंत्री)
रवनीत सिंग - अन्न प्रक्रिया उद्योग, रेल्वे मंत्रालय (राज्यमंत्री)
दुर्गादास उईके - आदिवासी विकास मंत्रालय (राज्यमंत्री)
रक्षा निखिल खडसे - युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय (राज्यमंत्री)
सुकांता मजुमदार - शिक्षण, ईशान्य राज्यांचे विकास मंत्रालय (राज्यमंत्री)
सावित्री ठाकूर - महिला आणि बालविकास मंत्रालय (राज्यमंत्री)
तोखान साहू -  गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालय (राज्यमंत्री)
राज भूषण चौधरी - जलशक्ती मंत्रालय (राज्यमंत्री)
भूपती राजू श्रीनिवास वर्मा - अवजड उद्योग आणि पोलाद मंत्रालय (राज्यमंत्री)
हर्ष मल्होत्रा - कॉर्पोरेट व्यवहार, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (राज्यमंत्री)
निमुबेन जयंतीभाई बांभनिया - ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय (राज्यमंत्री)
मुरलीधर मोहोळ - सहकार, नागरी उड्डाण वाहतूक मंत्रालय (राज्यमंत्री)
जॉर्ज कुरियन - अल्पसंख्याक विकास, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय (राज्यमंत्री)
पब्रिता मार्गेरिटा - परराष्ट्र, वस्त्रोद्योग मंत्रालय (राज्यमंत्री)
 
Edited by - Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments