Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अकरा महिन्याच्या मुलाने रिमोटचा सेल गिळला

Webdunia
शनिवार, 23 जून 2018 (17:03 IST)

पुण्यातील आळंदी येथे अकरा महिन्याच्या मुलाने रिमोटचा सेल गिळला आहे. हुजैफ  तांबोळी असे या मुलाचे नाव आहे. शनिवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास ही घटना घडली. हुजैफला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. आता दुर्बिणीच्या साह्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करुन तो सेल बाहेर काढण्यात येणार आहे.

सकाळी हुजैफ कुटुंबियांच्या आधी जागा झाला व खेळता खेळता टेबलावर ठेवलेला रिमोट त्याने उचलला. काही वेळाने त्याने तो रिमोट जमिनीवर आपटला. त्या आवाजाने सगळे जागे झाले. हुजैफने त्यानंतर कुटुंबियांचे लक्ष नसताना जमिनीवर पडलेला सेल उचलला व पटकन गिळून टाकला.

संबंधित माहिती

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

पुढील लेख
Show comments