Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अयोध्येमध्ये राममंदिर बनावे ही मुस्लिमांचीही इच्छा

Webdunia
अयोध्येमध्ये राममंदिर बनावे ही मुस्लिमांचीही इच्छा आहे असे पोस्टर उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये पूर्ण शहरात लावण्यात आली आहेत. मुस्लिमों का यही अरमान, श्रीराम मंदिर का हो वहीं निर्माण असे मुस्लिमांनी आपल्या पोस्टरवर लिहिले आहे. मुस्लिम कार सेवक मंचाचे अध्यक्ष आजम खान यांनी पूर्ण शहरात अशी दहा पोस्टर्स लावली आहेत.
 
या पोस्टरनंतर भारतीय जनता पक्षाने आपली काही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.   भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये राम मंदिराचा उल्लेख केला आहे. सत्तेमध्ये आल्यावर राम मंदिर बांधले जाईल, असे त्यांनी म्हटले होते.
 
गेल्या काही वर्षांपासून हिंदू आणि मुस्लिमांमध्ये समन्वय घडवून अयोध्येमध्ये राम मंदिर बनावे यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या कार्याला दोन्ही धर्मियांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु काही लोक त्यांना धमक्या देखील देत आहेत. तर काही लोकांचे असे म्हणणे आहे की त्या ठिकाणी तुम्ही मशीद बांधण्यासाठी का प्रयत्न करत नाही? यावर आपण राम मंदिराच्या निर्माणासाठी आवश्यक ते वातावरण बनवू असे, आजम खान यांनी सांगितले. 

मध्यप्रदेशात भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू, एक गंभीर

भारताने चीन सीमेजवळ टँक रिपेअर युनिट उभारले, पाकिस्तानची अवस्था बिकट

माझे काम संपल्यावर मी मी निघून जाईन, कोहलीचे मोठे वक्तव्य

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

पुढील लेख
Show comments