पंजाबच्या लुधियाना न्यायालय संकुलात झालेल्या स्फोटाप्रकरणी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. पंजाब पोलिसांनी फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे स्फोटात आरडीएक्सचा वापर केल्याचे सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी न्यायालयाच्या आवारात झालेल्या स्फोटात सुमारे दोन किलो आरडीएक्सचा वापर केला होता.
स्फोटामुळे पाण्याची पाइपलाइन फुटल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य पाण्यात वाहून गेले. सुदैवाने ज्या दिवशी स्फोट झाला त्यादिवशी कोर्टात संप सुरू होता, अन्यथा मोठी हानी होऊ शकली असती. त्याचवेळी, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटात सहभागी असलेले निलंबित हेड कॉन्स्टेबल गगनदीप यांच्या घरावर रात्री उशिरा एनआयए टीम आणि पंजाब पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी लॅब टॉप आणि मोबाईल फोन तपासणीसाठी ताब्यात घेतला आहे.
गगनदीप हा पंजाब पोलिसांचा बडतर्फ हेड कॉन्स्टेबल होता. तो पंजाबमधील खन्ना येथील रहिवासी होता आणि दोन वर्षांची शिक्षा भोगून बाहेर आला होता. गुरुवारी लुधियाना कोर्टात स्फोट झाला. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला. तर 5 जण जखमी झाले आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात मृत व्यक्तीने बॉम्ब ठेवल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गगनदीप कोर्टात बॉम्ब लावत होता. बॉम्ब ठेवताच स्फोट झाला. या मुळे त्याचा मृत्यू झाला . या अपघातात 5 जण जखमीही झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटादरम्यान गगनदीपच्या मोबाईलचा स्फोट झाला. पण गगनदीपकडे इंटरनेट डोंगल होते. ज्याच्या सिमद्वारे तो इंटरनेट वापरत होता.