Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आरएसएस विरोधातील टिप्पणी प्रकरणी 3 मार्चला सुनावणी

Webdunia
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येसंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात कथित टिप्पणी केल्याप्रकरणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सोमवारी भिवंडी कोर्टात हजर झाले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 मार्चला होणार आहे. 
 
या सुनावणीत राहुल यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. दरम्यान, मागील सुनावणीत कोर्टाने त्यांना जामीन दिला होता. दरम्यान कोर्टाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. गर्दीमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. महात्मा गांधी यांच्या हत्येप्रकरणी राहुल गांधी यांनी आरएसएसविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यावरून त्यांच्या विरोधात आरएसएसने अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल केला होता.
सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments