Manipur News : मणिपूरात हिंसाचार सध्या सुरु आहे. राजधानी इंफाल पश्चिम आणि पूर्व मध्ये सध्या कर्फ्यू लावण्यात आले आहे. दरम्यान मणिपूर सरकारने सचिवालय उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये राज्यपीठासंह संस्था, मंगळवार 19 नोव्हेंबर पर्यंत बंद करण्याची घोषणा केली आहे.
हा निर्णय मणिपूर सरकारच्या गृहविभागाशी सल्लामसलत करून घेतला आहे. शाळा, सचिवालय आणि महाविद्यालये आज आणि उद्या बंद राहणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा दंडाधिकाऱ्यानी लावलेल्या संचारबंदीला लक्षात घेत विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षेचा विचार करून हा आदेश घेण्यात आला आहे.
मणिपूर सरकारच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागांतर्गत राज्य विद्यापीठांसह सर्व सरकारी संस्था/सरकारी अनुदानित महाविद्यालये 18 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत दोन दिवस बंद राहतील.
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) या महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात मणिपूरमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचाराशी संबंधित तीन प्रमुख प्रकरणांचा तपास हाती घेतला आहे,
रविवारी मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार पुन्हा एकदा वाढला आहे, ज्यामुळे मणिपूर पोलिसांनी इंफाळ पश्चिम आणि इंफाळ पूर्व दोन्ही जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू केला आहे. सहा मृतदेह सापडल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली होती. वाढत्या हिंसाचारामुळे राज्य सरकारने सात जिल्ह्यांतील इंटरनेट सेवाही बंद केली आहे.