Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 10 March 2025
webdunia

शिवसेना नेते सुधीर सुरी यांची गोळ्या झाडून हत्या

crime
, शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2022 (17:16 IST)
अमृतसरमधील मजिठा रोडवरील गोपाल मंदिराजवळ शुक्रवारी संध्याकाळी शिवसेना हिंदू नेते सुधीर सुरी यांची काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. हल्ल्याच्या वेळी ते त्यांच्या साथीदारांसह मंदिराबाहेरील मूर्तींच्या विटंबनेला विरोध करत होते. गंभीर अवस्थेत त्यांना  फोर्टिस एस्कॉर्ट्स रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. एका आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. त्याच्याकडून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी हिंदू नेते सुधीर सुरी हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत गोपाल मंदिराबाहेर मूर्तींच्या विटंबनाविरोधात निदर्शने करत असताना अज्ञात तरुणांनी हिंदू नेत्यावर गोळीबार केला, गोळी त्यांच्या छातीत लागली.
 
सुरीच्या सुरक्षेत तैनात असलेल्या सुरक्षा जवानांनीही हवेत गोळीबार केला, मात्र हल्लेखोर दृष्टीक्षेपातच गायब झाले. गोळी लागताच ते जमिनीवर कोसळले त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा  मृत्यू झाला. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
 
पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. सुरी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या समर्थकांनी अनेक वाहनांची तोडफोड केली आणि घोषणाबाजी केली. पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
 
Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

6 वर्षाच्या चिमुकल्याला लाथेने मारहाण