rashifal-2026

देवदर्शनाला जाताना भाविकांच्या वाहनाचा अपघात, सहा ठार

Webdunia
रविवार, 5 मे 2024 (13:13 IST)
राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यात दिल्ली -मुंबई द्रुतगती मार्गावर सकाळी झालेल्या रस्ता अपघातात कारमधून  प्रवास करणाऱ्या सहा जणांचा मृत्यू झाला. तर दोन मुळे जखमी झाली. हे सर्व जण देवदर्शनासाठी रणथंबोर गणेश मंदिरात जात होते. या वेळी त्यांच्या वाहनाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली .
हा अपघात सकाळी आठ वाजता बाऊनली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनास पुलाजवळ झाला. कार मध्ये असलेले प्रवाशी देवदर्शनासाठी रणथंबोर जात होते. 
 
या दरम्यान दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांची जोरदार धडक झाली आणि अपघात घडला. या अपघातात कारचा चक्काचूर झाला. आणि त्यातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

अपघाताची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अपघाताची नोंद करून  मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले.अपघातात जखमी झालेल्या दोन मुलांना बाऊनलीच्या रुग्णालयात दाखल केले आहे.पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
 
 Edited By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

पुढील लेख
Show comments