Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काश्मिरी मुलीचा व्हायरल व्हिडिओ : पंतप्रधान मोदींकडे थेट ऑनलाईन जास्त होमवर्कबाबत तक्रार

Webdunia
बुधवार, 2 जून 2021 (14:55 IST)
Twitter
सोशल मीडियावर अनेक लहान मुला-मुलींचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूप मजेशीर असतात. काही व्हिडीओ आपल्याला प्रेरणा देणारे असतात. व्हिडिओमध्ये दिसत असलेली ६ वर्षांची चिमुकली काश्मीरमध्ये राहणारी आहे. कोरोना काळात सध्या ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत. मात्र यामुळे मुले वैतागली आहेत. या मुलीनेही कंटाळून पंतप्रधान नरेंद्र मोदींना भावूकपणे आवाहन केले आहे.  
 
मुलीचा निरागस व्हिडिओ
चिमुकलीचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे. व्हिडिओमध्ये ही चिमुकली म्हणत आहे की, अस्सलाम अलैकुम मोदी साहेब, मी एक मुलगी बोलत आहे. पुढे ही चिमुकली म्हणते, जी मुले ६ वर्षांची असतात त्यांना जास्त काम का दिले जाते. आदी इंग्रजी, गणित, उर्दू, ईव्हीएस आणि त्यानंतर कम्प्युटर क्लास. माझा क्लास सकाळी १० वाजल्यापासून सुरू होतो तो दुपारी २ वाजेपर्यंत सुरू असतो. इतकं काम तर मोठ्या मुलांकडे असतं. 
 
<

A six-year-old Kashmiri girl's complaint to @PMOIndia @narendramodi regarding long hours of online classes and too much of school work. pic.twitter.com/S7P64ubc9H

— Aurangzeb Naqshbandi (@naqshzeb) May 29, 2021 >आतापर्यंत 1 मिनिटाचा व्हिडिओ 32 हजारहून अनेकांनी पाहिला आहे. तर, जवळपास 3 हजार जणांनी लाईक आणि 630 जणांनी तो रिट्विट केला आहे. या व्हिडिओवर कमेंट करत अनेक यूजरनं तिचं कौतुक केलं आहे.
 
राज्यपालांनी घेतली दखल
मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी तातडीने कारवाई केली आहे. त्यांनी लिहिले की, ही खूपच निरागस तक्रार आहे. शाळेच्या मुलांवरील घरच्या अभ्यासाचे ओझे कमी करण्यासाठी शिक्षण विभागाला ४८ तासांच्या आत नीती तयार करण्याचे आदेशदिले आहे. मुलांची निरागसता हे देवाचे देणे आहे आणि त्यांचे जीवन हे आनंद आणि आनंदाने भरलेले असले पाहिजे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments